खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यात दहावीच्या बोर्ड परीक्षेला सोमवारी दि २८ पासुन प्रारंभ झाला.
खानापूर तालुक्यात दहावी परीक्षेच्या प्रथम भाषा पेपरला संपूर्ण तालुक्यातून ३१ विद्यार्थी गैरहजर होते. तर तालुक्यातून दहावीच्या परीक्षेला एकूण ३६६९ विद्यार्थी होते. त्यापैकी ३६३८ विद्यार्थी हजर राहून दहावीची प्रथम भाषा परीक्षा दिली.
खानापूर शहरासह तालुक्या एकूण १५ दहावीची परीक्षा केंद्रे होती.
यामध्ये खानापूर शहरातील ताराराणी हायस्कूल, मराठा मंडळ हायस्कूल, व सर्वोदय इंग्रजी हायस्कूल असून तालुक्यातील जे पी व्ही विद्यालय गर्लगुंजी, जांबोटी विद्यालय जांबोटी, पारिश्वाड हायस्कूल पारिश्वाड, सरकारी हायस्कूल चिगदिनकोप, एम जी हायस्कूल नंदगड, हलशी हायस्कूल हलशी, सरकारी हायस्कूल गुंजी, लोंढा हायस्कूल लोंढा, सरकारी लिंगनमठ हायस्कूल लिंगनमठ, इटगी हायस्कूल इटगी, होली क्राॅस हायस्कूल बिडी, एम एन एच एस हायस्कूल बिडी, अशी एकून १५ दहावीची परीक्षा केंद्रे होती.
दहावीच्या प्रथम भाषा पेपला बेळगांव जिल्हा शिक्षण आयुक्त एस. एस. बिरादार यांनी खानापूर, गुंजी, लोंढा आदी परीक्षा केंद्राना भेटी देऊन पाहणी केली. खानापूर तालुक्यातील दहावीचा प्रथम भाषा पेपर सुरळीत पार पडला.
