खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथे मंगळवारी दि. ५ रोजी ग्रामदैवत श्री कलमेश्वर यात्रा सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली.
सालाबादप्रमाणे यंदाही श्री कलमेश्वर यात्रेला सोमवारी दि. ४ पासून प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी गावातील विविध देवदेवताची विधावत पुजा, अभिषेक करण्यात आले. दुपारी २ वाजता करडी मजल व भजनाच्या नादात गावातुन देवीची पालखी व आंबील गाडे कलमेश्वर मंदिराकडे प्रयाण होऊन यात्रेची उत्साहात सुरूवात झाली.
तर मंगळवार दि. ५ रोजी पहाटे सिंगीनकोप गावच्या मानकऱ्यांच्या हस्ते पिंडीला अभिषेक, होईन सकाळी इंगळ्याचा कार्यक्रम झाला.
यावेळी सुवासिनीसह नागरिकांनी इंगळ्याचा आनंद लुटला.
त्यानंतर मंदिरा भोवती प्रदक्षिणा होऊन ईडलहोंड, अंकले, निट्टूर, गणेबैल, काटगाळी, खेमेवाडी, निडगल, गर्लगुंजी गावच्या भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घेतला.
Check Also
खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना यांच्यावतीने रविवारी आरोग्य तपासणी शिबीर
Spread the love खानापूर : खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना खानापूर यांच्या सौजन्याने …