Thursday , June 20 2024
Breaking News

माणिकवाडी मराठी शाळेत विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : माणिकवाडी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष महेश मयेकर होते. कार्यक्रमाला प्रा. शंकर गावडा, गणपती सुतार
सौ.प्रिती प.गोरल, सर्व ग्रा.पं.सदस्य,{तसेच गंगाराम गुंडू होनगेकर, मधुकर होनगेकर निवृत्त सैनिक आदी उपस्थित होते.
पाहुण्याच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले. यावेळी प्रा. शंकर आ. गावडा, मधुकर होनगेकर, सौ. अश्विनी ह.करंबळकर अतिथी शिक्षिका यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भेटीदाखल मूलांनी शाळेसाठी 2 फोटो दिले.

यावेळी विद्यार्थी वर्गाचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व स्वागत शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक हणमंत करंबळकर यांनी केले. आभार कन्नड शिक्षिका सौ. एस. एस. गायकवाड यांनी मानले

About Belgaum Varta

Check Also

चन्नेवाडी ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन

Spread the love  खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील ग्रामस्थांनी क.नंदगड ग्रामपंचायतीचे विकासाधिकारी श्री. भीमाशंकर यांचेकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *