Tuesday , March 3 2026
Breaking News

गर्लगुंजीत भंडार्‍याची उधळण करत लक्ष्मी, मर्‍याम्मा देवीच्या मुर्तीच्या मिरवणुकीला सुरूवात

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावच्या लक्ष्मी आणि मर्‍याम्मा मंदिराचा जीर्णोद्धार करून नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरात लक्ष्मी आणि मर्‍याम्मा देवींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येत आहे.
यानिमित्ताने मंगळवारी दि. 3 मे रोजी गावची ग्रामदेवता माऊली मंदिरापासून मुर्तीच्या मिरवणुकीला मंगळवारी पहाटेपासून वाद्याच्या तालावर व भंडार्‍याची उधळण करत गावच्या पंचाच्या व मानकर्‍यांच्याहस्ते पुजन करून मुर्तीच्या मिरवणुकीला सुरूवात झाली.
यावेळी माऊली मंदिरापासून मिरवणुकीला सुरूवात करत बेळगाव-खानापूर मार्गावरून गर्लगुंजी गावात मिरवणुकीला प्रवेश करण्यात आला. यावेळी लक्ष्मी आणि मर्‍याम्मा देवीच्या मुर्तीची मिरवणूक प्रथमत: देव घराकडे नेण्यात आली.
येथे मुर्तींचे सुवासिनींच्याहस्ते आरती करून तिचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावातील प्रत्येक गल्लोगल्ली देवीच्या मुर्तीची मिरवणूक काढण्यात आली.


गर्लगुंजी गावात गल्लोगल्ली भगवा पताका, दारात रंगीत रांगोळी घालून सजावट करण्यात आली होती. प्रत्येक घरोघरी सुवासिनीक आरती ओवाळून देवीच्या मुर्तीचे दर्शन घेत होते. सर्वत्र भंडाराची उधळण होत होती, युवा कार्यकर्ते हळदी रंगाचा पोशाख परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते.
या मिरवणुकीत अबालपासून वृध्दापर्यंत सर्वजण सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *