खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यात निरंतर ज्योती योजना कार्यान्वित होऊन शेतकरी वर्गाला चांगलाच लाभ होत आहे. तालुक्यात २१८ खेड्यापैकी १६५ खेड्याना या निरंतर ज्योती योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरीत खेड्यानाही निरंतर ज्योती योजनेचा लाभ लवकरच मिळणार आहे.
त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातील इटगी विभागातील बोगूर येथे निरंतर ज्योती योजनेंतर्गत शिवारतील ७० घराना निरंतर ज्योती योजनेचा लाभ हेस्काॅम खात्याच्यावतीने शनिवारी करून देण्यात आला आहे.
यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते विद्युत खांबाची पुजा करण्यात आली. तर हेस्काॅम कार्यकारी अभियंत्या कल्पना तिरवीर यांनी कामाचा शुभारंभ केला.
यावेळी बोलताना हेस्काॅम कार्यकारी अभियंत्या कल्पना तिरवीर म्हणाल्या की, बोगूर भागात २४ तास वीजपुरवठा पाहिजे असे शेतकरी वर्गाची मागणी आहे याची पूर्तता व्हावी.
यासाठी बोगुर येथे निरंतर ज्योती योजना आमलात आली. त्यामुळे शेतकरी वर्गाची २४ तास वीजपुरवठा मागणी पूर्ण झाली.
याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी निरंतर ज्योती योजनेचा लाभ घ्यावा व आपली प्रगती साधावी, असे आवाहन यावेळी केले.
यावेळी बोगूर, इटगी आदी भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*प्रतिक्रिया
बोगूर गावातील शेतकरी वर्गाची मागणी पूर्ण करण्यासाठी ५२ विद्युत खांबाची व्यवस्था करण्यात आली असुन जवळपास ७० घराना निरंतर ज्योती योजनेचा लाभ होणार आहे. तेव्हा शिवारातील कुटूंबानी वीजपुरवठा चांगल्या पद्धतीने वापर करावा. वीजपुरवठा वेळी योग्य ती दक्षता घ्यावी.
-कल्पना तिरवीर, हेस्काॅम कार्यकारी अभियंत्या, खानापूर
Check Also
खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणूक २७ रोजी; दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव
Spread the love खानापूर : खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा …