खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील करंबळ गावच्या बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह मलप्रभा नदीत सापडला. त्या तरूणाचे नाव परशराम जयराम पाटील वय २७ असे आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गेल्या पंधरा दिवसापूर्वी कामाला जातो म्हणून घराबाहेर पडलेल्याचा दोन दिवस झाले तरी पत्ता नाही. म्हणून घरच्यानी शोधाशोध करून पाहिले. परंतु कुठेच शोध लागला नाही. म्हणून खानापूर पोलिस स्टेशनमध्ये १ सप्टेंबर रोजी तक्रार नोंदविली. आपल्या पै-पाहुण्याकडे विचारपुस करूनही सापडला नाही.
करंबळ गावापासून काही अंतरावर असलेल्या कुप्पटगिरी गावाजवळच्या मलप्रभा नदीत तरूणाचा मृतदेह तंरगताना नागरिकांना दिसला. लागलीच खानापूर पोलिसांना हे वृत्त कळविण्यात आले. लागलीच पोलिसानी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आला
परंतु मृ़तदेह पूर्णपणे सडलेला होता. त्यामुळे ओळख पटणे कठीण होते. यासाठी परशराम पाटील याच्या घरी कळविण्यात आले. शेवटी कपड्यावरून परशरामचा मृतदेह असल्याचे स्पष्ट होताच मृतदेह उत्तरतपासणी नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.
त्याच्या अकस्मात निधनाने करंबळ गावावर शोककळा पसरली.
Check Also
कन्नड सक्तीच्या फतव्याविरोधात युवा समिती सीमाभागची बैठक
Spread the love सीमाभागातल्या मराठी बहुभाषिक मतदारसंघातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार बेळगाव : म. …