Tuesday , September 17 2024
Breaking News

कोल्हापूर जिल्ह्यात कोविड-19 निर्बंधामध्ये शिथिलता

Spread the love

कोल्हापूर (जिमाका): वेगवेगळ्या भागातील कोविडची सद्यस्थिती, त्या भागात असलेली जोखीम, तेथिल लसीकरणाची स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेल्या ऑक्सिजन व आयसीयू बेडची संख्या या आधारावर वर्गीकरण करुन प्रशासकीय घटक ‘अ’ आणि प्रशासकीय घटक ‘ब’ अशी विभागणी करण्यात आली आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांना पूर्ण लसीकरणाच्या टक्केवारीच्या आधारे ‘अ’ यादीत समाविष्ट करण्यात आले असून आणखी काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याअनुषंगाने कोल्हापूर जिल्हा ‘अ’ यादी मध्ये समाविष्ठ असल्याने यापूर्वी लागू करण्यात आलेल्या सर्व निर्बंधांना रद्द करुन नमुद अटी व शर्तीस अधीन राहून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी दिनांक 4 मार्च रोजी 12.00 वाजल्यापासून पूर्ण जिल्ह्यामध्ये खालील निर्बंध लागू केले आहेत.
लागू करण्यात आलेले निर्बंध याप्रमाणे
ए) व्यक्तीचे पूर्ण लसीकरण याची व्याख्या पूर्वीप्रमाणेच असेल आणि कोविड अनुषंगिक व्यवहार (सी ए बी) करणे बंधनकारक असेल. जर या आदेशामध्ये एखाद्या कार्यक्रमाचा उल्लेख नसेल तर अशा स्थितीत त्या कार्यक्रमासाठी भारत सरकारने जारी केलेले सर्व मार्गदर्शक निर्देश लागू पडतील. जर एखाद्या बाबतीत राज्य तसेच केंद्र सरकार, असे दोन्हींचे ही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या असतील, तर अशा स्थितीत जो निर्बंध जास्त कठोर असेल, त्याची अंमलबजावणी केली जाईल.
बी) प्रशासकीय घटक जिल्ह्यातील महानगरपालिकेला वेगळा प्रशासकीय घटक आणि उर्वरीत जिल्ह्याला दुसरा स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून गृहीत धरले जाईल.
सी) पूर्ण लसीकरणाची आवश्यकता
1) सामान्य नागरिकांना सर्वसाधारणपणे कोणत्याही सेवा देणार्‍या सर्व आस्थापनांच्या संपूर्ण कर्मचारी वर्गाचे पूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक असेल; 2) घरपोच सेवा देणार्‍या सर्व कर्मचार्‍यांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक असेल; 3) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करणार्‍या सर्वांसाठी पूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक असेल; 4) सर्वसामान्य लोक भेट देतात अशा सर्व ठिकाणी म्हणजेच मॉल, थिएटर, नाट्यगृह, पर्यटन स्थळ, उपहारगृह, क्रीडा सामने, धार्मिक स्थळ इ. ठिकाणी भेटी देणार्‍या सर्व अभ्यागतांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक असेल; 5) औद्योगिक क्षेत्राशी निगडीत सर्व कर्मचार्‍यांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे अनिवार्य असेल.
डी) सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सणासुदीशी संबंधित कार्यक्रम, विवाह समारंभ, अंत्ययात्रा किंवा इतर जमावाच्या ठिकाणी कार्यक्रम स्थळाच्या क्षमतेच्या पन्नास टक्क्यांपर्यंत उपस्थितीस मुभा देण्यात आली आहे. परंतु एखाद्या ठिकाणी जर एक हजारापेक्षा जास्त लोक एकत्र जमणार असतील तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास त्याची माहिती द्यावी लागेल आणि ते यावर आवश्यकतेनुसार निर्बंध घालू शकतील.
इ) सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या संबंधित प्रशासकीय विभागाच्या आदेशाच्या अधीन राहून प्रत्यक्ष (ेषषश्रळपश) वर्ग घेण्यास परवानगी असेल. अशा सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रशासकांनी ऑफलाईन सहित ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावेत. सर्व अंगणवाड्या व पूर्व प्राथमिक शाळांना प्रत्यक्ष वर्ग घेण्याची परवानगी देण्यात येत आहे, परंतु अशा सर्व संस्था आणि आस्थापनांना कोविड अनुरुप व्यवहाराचे अनुपालन कटाक्षाने करावे लागेल.
एफ) सर्व प्रशासकीय घटकांसाठी सर्व प्रकारच्या घरपोच सेवांना परवानगी देण्यात येत आहे.
जी) सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृह, उपहारगृह, बार, क्रीडा संकुल, व्यायामशाळा, स्पा, जलतरण तलाव, धार्मिक स्थळ, नाट्यगृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क इत्यादींना शंभर टक्के क्षमतेने कार्यान्वीत करण्यास परवानगी असेल.
एच) पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींना आंतरराज्य तसेच राज्यांतर्गत प्रवास करण्यास पूर्ण परवानगी असेल. इतर राज्यांमध्ये ये- जा करण्यासाठी पूर्ण लसीकरण झाले नसलेल्या लोकांना मागील 72 तासाच्या आत मध्ये चाचणी करून आणलेले निगेटीव्ह आर टी पी सी आर अहवाल दाखवणे बंधनकारक असेल.
आय) शासकीय व खासगी कार्यालयांना पूर्ण क्षमतेने कार्य करण्याची परवानगी असेल.
जे) सर्व औद्योगिक आणि वैज्ञानिक संस्था पूर्ण क्षमतेसह काम करू शकतील.
वरील उल्लेखित निर्बंधाशिवाय कोणतेही निर्बंध संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लागू असणार नाहीत.
या आदेशाचे पालन न करणार्‍या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.

About Belgaum Varta

Check Also

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या

Spread the love  मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी टोकाचे पाऊल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *