बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात संपूर्ण 3 दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या आणि बळी पाहता शुक्रवार 4 जून सकाळी 6 वाजल्यापासून शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस कडकडीत लॉकडाऊन आहे. सोमवार 6 जून सकाळी 6 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील. शुक्रवार 4 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून कडक लॉकडाऊन लावला जाईल. सोमवार सकाळी 6 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील. बेळगाव जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी हा आदेश दिला आहे.
जर कोणी विनाकारण घराबाहेर पडल्यास त्याच्यावर कारवाई निश्चित आहे असा इशारा डीसीपी विक्रम आमटे यांनी दिलायं. लॉकडाऊनचा लोकांवर काहीच परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सकाळी 6 ते 10 दरम्यान जीवनावश्यक वस्तू खरेदीची सवलत दिलेल्या काळात तर लोकांची तोबा गर्दी होत आहे. यातूनच लॉकडाऊनचा प्रभाव कमी जाणवत असल्याने 3 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू केला आहे. सरकारी राशन दुकानं आणि केवळ दूध आणि मेडिकल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंना परवानगी आहे. हे वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद असणार आहेत.