Wednesday , December 4 2024
Breaking News

शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड; मुंबई, पुणे आणि रत्नागिरीत कारवाई सुरु

Spread the love

मुंबई : शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली जात आहे.
ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले आहेत. यासोबत पुणे आणि रत्नागिरीमधील अनिल परब यांच्या मालकीच्या जागांचीही पाहणी केली जात आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमधील एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे.
अनिल परबांना तुरूंगात जावे लागणार, सोमय्यांचा इशारा
परिवहन मंत्री अनिल परब यांनाही आता तुरूंगाची हवा खावी लागेल. त्यांनी आता त्यासाठी तयार रहावे, असा इशारा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. अनिल परब यांच्या निवासस्थानी व राज्यात सात ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापासत्र सुरू केले. सोमय्या यांनी परब यांच्या विरोधात विविध पातळ्यांवर तक्रारी नोंदविल्या असून ईडीने त्यासंदर्भात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यानेही परब यांना पैसे दिल्याचा जबाब दिला आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना सोमय्या म्हणाले, “बेनामी मालमत्ता, आर्थिक अफरातफर (मनी लाँड्रिंग), बोगस (शेल) कंपन्या, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयालयाकडे करण्यात आलेल्या तक्रारी आणि फेमा कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघनासाठी ईडीने कारवाई सुरू केली आहे. मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक हे तुरूंगात गेले. आता परब यांची वेळ आली आहे”.
“यशवंत जाधव यांच्या दुबई संबंधांची ईडीने चौकशी केली असून हसन मुश्रीफ व अन्य नेत्यांची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील गैरव्यवहार करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई होईल,” अशी अपेक्षा सोमय्या यांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब; एकनाथ शिंदेंचा गृहमंत्रिपदासह तब्बल 12 मंत्रि‍पदावर दावा

Spread the love    नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदावरुन रंगलेले राजकारण संपता संपत नसल्याचे पाहायला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *