माणगांव (नरेश पाटील) : शहरात मोर्बा रोड येतील कोकण बाझारच्या समोर जगदंब मोटर्स या नव्या दुचाकी शोरूमचे उद्घाटन रविवार दि. 29 मे रोजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी वॉर्डातील सदस्य तथा न. पं. चे घटनेते प्रशांत साबळे त्याच बरोबर नितीन बामगुडे, संदीप करंगटे, अमोल मोने, पोलीस पाटील रामचंद्र मुंडे, पालकर गुरुजी, सदर शोरूमचे प्रो. प्रा. संदेश तेटगुरे व रोशन मुरकर तसेच महेश पोवार, शशिकांत पोवार, सदानंद तेटगुरे, विशाल खरंगटे, बाळा पोवार, शुभम शिंदे, भागोजी मुरकर आदींसह मोठ्या संख्येने युवा उपस्थित होते.
यादरम्यान प्रो. प्रा. यांनी आमच्या प्रतिनिधीशी वार्तालाप करताना सांगितले की, आमच्या या नवीन दुचाकी शोरूमचे जनतेसाठी वैशिष्ट्य म्हणजे ही दुकान एक मल्टि चॉईस न्यू टू व्हिलर शोरूम आहे त्याचबरोबर सेल्स फायनान्स व इन्शुरन्सची सेवा उपलब्ध आहे.
