सांगली : पुणे -बंगळुरू महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कार आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून सांगलीकडे जाताना हा अपघात घडली आहे. यामध्ये गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले जयसिंगपूर येथी रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
अरिंजय आण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरु अभिनंदन शिरोटे अशी अपघातातील मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. शिरोटे कुटुंबिय पिंपरी-चिंचवड येथून जयसिंगपूरकडे निघाले होते. त्यावेळी कासेगावजवल रस्त्याच्या कडेला अभ्या असणाऱ्या कंटेनरला मागून कारची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघांचा रूग्णालयात दाखल करताना मृत्यू झाल्याचे समजत आहे.
Check Also
अर्जुन विष्णू जाधव साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित
Spread the love ठाणे : निर्भिड व परखडपणेच लिहिणारे नव्या दमाचे लेखक, कवी आणि पत्रकार …