मुंबई : विधान परिषदेची पाचवी जागा जिंकण्यासाठी सर्व पूर्वयोजना तयार झाली आहे. मी कंजूस असल्याने राज्यसभेचा गुलाल शिल्लक ठेवलाय. तो विधानपरिषदेला वापरणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधान परिषद निवडणुकीत भाजपने पाच उमेदवार उभे केल्याने मतांची जमवाजमव करण्यासाठी भाजपची अपक्ष आमदारांसोबत चर्चा सुरू आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीला शह देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. यासाठी भाजच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकाही होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
यावेळी ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पाचवी जागा जिंकण्यासाठी सर्व योजना आखली आहे. या निवडणुकीतही गुलाल आमचा आहे. मी कंजूस असल्याने राज्यसभा निकालाचा गुलाल शिल्लक ठेवलाय, तो विधानपरिषदेला वापरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाटील यांच्या या वक्तव्यावरून भाजपने विधानपरिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीतील आमदारांना फोडण्याची रणनीती भाजप आखत आहे. भाजपचे हे चक्रव्यूह महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हानात्मक आहे.
Check Also
देवेंद्र फडणवीसच भाजपचे विधिमंडळ पक्षनेते; कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
Spread the love मुंबई : मुंबईत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत …