मुंबई : एकनाथ शिंदे यांच्याबराेबर गुवाहाटीला गेलेले २० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करत शिवसेनेचे १७ ते १८ आमदार भाजपच्या ताब्यात आहेत. हे भाजपचे कारस्थान असून शिंदे गटात आमदार का जात आहेत याचे सत्य लवकरच बाहेर येईल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सांगितले.
बंडखाेर आमदारांनी पुन्हा निवडून येवून दाखवावे
शिवसेनेमध्ये सर्वात मोठे बंड करून ३५ आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेलेल्या एकनाथ शिंदे यांना शिवसेना आमदार आणि खासदारांचा पाठिंबा वाढताना दिसत आहे. आज सकाळी आणखी तीन आमदार शिंदे गटात सामील झाले. आतापर्यंत एकूण ४६ आमदारांचे संख्याबळ शिंदेसोबत स्पष्ट झाले आहे. याबाबत बाोलताना राऊत म्हणाले की, आज राज्यातील लाखाे शिवसैनिक उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आहेत. आता बंड करणार्या आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.
शिवसेनेचे १७ ते १८ आमदार भाजपच्या ताब्यात आहेत तसेच हे भाजपचे कारस्थान असून शिंदे गटात आमदार का जात आहेत याचे सत्य लवकरच बाहेर येईल असे राऊत म्हणाले. काल रस्त्यावर उतरली ती खरी शिवसेना आहे, पळून गेलेत ती शिवसैनिक नाहीत, असेही ते यावेळी म्हणाले. आज मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक रद्द करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.