Wednesday , December 6 2023
Breaking News

ज्ञानदेव पवार यांची माणगांव नगराध्यक्षपदी निवड

Spread the love

माणगांव (नरेश पाटील) : गुरुवार दि. 10 रोजी माणगांव नगरपंचायतच्या अध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष पदाकरिता निवडणुकीचा निकाल लागला असता ज्ञानदेव पवार हे अध्यक्षपदी विराजमान झाले तर उपाध्यक्षपदी सचिन बोंबले यांची निवड झाली.
दुपारी 12:15 वाजता ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. ज्ञानदेव पवार हे माणगांव नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार असे भाकीत आमच्या दैनिकाने व्यक्त केले त्यावर आज शिक्कामोर्तब झाला.
माणगांव विकास आघाडीने या न.पं. च्या निवडणुकीत बहुमत प्राप्त करून दणदणीत यश मिळविले. एकूण 17 जागा पैक्की नऊ जागा पटकावून सत्ता परिवर्तनही केले. दरम्यान स्वीकृत नगरसेवक पदाची निवड झाल्यानंतरच खर्‍या अर्थाने सभागृह अस्तित्वात येणार आहे.
माणगांव न. पं. च्या निवडणुकीत खरी लढत ही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच माणगांव विकास आघाडी घटक बरोबर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शेकाप एकत्र लढले तर माणगांव विकास आघाडी आय काँग्रेस, शिवसेना व भाजपा पुरस्कृत आघाडी बनवून लढले. अखेर निकाल लागला त्या समयी माणगांव विकास आघाडीने 17 पैक्की नऊ जागा काबीज करून सत्तांतर घडवून आणले आणि सत्तेवर राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा हादरा देत परिवर्तन केले. पुढे नागराध्यक्ष पदासाठी अर्ज भरून आपला उमेदवार ज्ञानदेव पवार यांना तर उपनगराध्यक्षकरिता सचिन बोंबले यांना निवडून आणले.
ज्ञानदेव पवार यांची नगराध्यक्ष पदी तसेच सचिन बोंबले यांची उपनगराध्यक्ष पदी निवड होताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष करत जंगी मिरवणूक काढली. या विजयोत्सव साजरा करण्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, माणगांव,महाड पोलादपूरचा शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले, जिल्ह्यामधील इतर शिवसेनेचे आमदार, जिल्ह्याचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते राजीव साबळे, दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल नवगणे, ता. अध्यक्ष गजानन अधिकारी, ता. भाजपचे अध्यक्ष संजय अप्पा ढवले, ता.महिला अध्यक्ष सौ. सत्वे यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते शामिल झाले होते. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी जी प्रक्रिया पार पडली त्यात ज्ञानदेव पवार यांनी आठ विरुद्ध नऊ अशी मते मिळवून नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले. तर शेकाप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच राहिल्याची बाब समोर आले.

About Belgaum Varta

Check Also

दिवाळीत गावी जा, पण ‘एक अर्ज पोलीस ठाण्याला’ द्या; माणगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम

Spread the love  माणगाव (नरेश पाटील) : शिक्षण संस्था तथा कार्यालय दिवाळीची सण सुट्टी असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *