Monday , June 17 2024
Breaking News

महारक्तदान शिबीरनिमित्त नियोजन बैठक संपन्न

Spread the love

माणगांव (नरेश पाटील) : शिवजयंती निमित्त शनिवारी दि. 19 रोजी महारक्तदान शिबीरचे आयोजन माणगांव तालुका पत्रकार संघ तसेच इतर संलग्न यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. ही शिबीर सरलादेवी मंगल कार्यालयात सकाळी 10:00 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आयोजन करण्यात आली आहे. या शिबीरासाठी के.ई.एम. रुग्णालय परळ मुंबई यांचा विशेष सहकार्य लाभणार आहे. त्याचबरोबर नगरपंचायतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीने उद्धघाटन होणार आहे. दरम्यानच्या काळात आयोजकांनी ज्ञानदेव पवार यांना संपर्क साधून बैठकीच्या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे रक्तदान शिबीराच्या नियोजन मंडळाची बैठक सायंकाळी माणगांव रेस्ट हाऊस येथे पार पडली. माणगांव ता. पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख, पदाधिकारी, सदस्य त्याचबरोबर देवा ग्रुप फौंडेशन माणगांव, छावा प्रतिष्ठान रायगड, एस.एस. निकम स्कूल, माणगांव जनरल नर्सिंग कॉलेज, रोटरी क्लब माणगांव, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ता. माणगांव शाखा, अविष्कार फौंडेशन इंडिया रायगड ता.माणगांव, नवयुवक मित्र मंडळ खांदाड, टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेज, शिवम कॉम्पुटर सेंटर माणगांव, जुने माणगांव मस्जिद मोहल्ला, माणगांव एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन माणगांव, उपजिल्हा रुग्णालय माणगांव, शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन, युवा क्रिकेट क्लब माणगांव, व्यपारी असोसिएशन माणगांव, नमस्कार मित्र मंडळ बेंडशेत ता. माणगांव तसेच पालवी मित्र मंडळ इंदापूरचा पदाधिकारी व सदस्य यांनी यावेळी उपस्थिती दर्शवून सर्व जबाबदारी स्वीकारून जास्तीत जास्त रक्त जमा करण्याचीही संकल्पना यावेळी करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे उघडले; मनोज जरांगे-पाटील यांना भेटणार शंभुराजे देसाई

Spread the love  जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये सहा दिवसांपासून उपोषणाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *