माणगांव (नरेश पाटील): प्रभाग 17 मधील भागात सामाजिक भावना ठेवून माणगांव विकास आघाडीतील प्रमुख कार्यकर्ते तसेच नगरपंचायतचे कर्मचारी संयुक्तरितीने स्वच्छता मोहिम राबविण्याकरिता पुढे सरसावल्याचे दिसून आले. सदर मोहीम शुक्रवार दि.11 मार्च रोजी सायंकाळी या भागातील एका स्मशानभूमीच्या आवारात पार करण्यात आला. या मोहिमेमध्ये प्रामुख्याने सिराजभाई परदेशी, प्रवीण भागवे, बशीर खरेल, नितीन मोरे, नंदू पवार, सुरेश मोरे तसेच न.पं. च्या काही कर्मचारी होते.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता या स्मशानाचे दुसऱ्यांदा आठ दिवसाच्या अंतरामध्ये स्वच्छता उपक्रम हाती घेण्यात आले. हा उपक्रम सायंकाळीच्या सुमारास तब्बल चार तास करण्यात आली. सदर आवारात झुडुपे, रानटी झाडे, पसरलेल्या वेली, उंच वाढलेले गवत, काटेरी झाडे हे सर्व कापून तसेच जाळून स्वच्छता करण्यात आली. या दरम्यान पुढल्या शुक्रवारी दि. 19 मार्च रोजी कब्रस्थानच्या भागातही अशीच स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार त्याचबरोबर येथील माणगांव विकास आघाडीचे नगरसेवक दिनेश रातवडकर यांनी या गोष्टीची दखल घेऊन समाधान व्यक्त केल्याचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते सिराज परदेशी यांनी सांगितले.
