मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाद्वारे सर्व सहा आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
जस्टीस ए. एस. किलोर यांच्या एकल खंडपीठाने हत्या प्रकरणातील सहा आरोपींचा जामीन मंजूर केला आहे. सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, अमित बट्टी, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या आरोपींनी जामीनाचा अर्ज केला होता. २०१८ आणि २०१९ मध्ये आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून ते कारागृहात आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किलोर यांनी या हत्या प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘बऱ्याच कालावधीपासून हत्या प्रकरणातील आरोपी कारावासात आहेत. प्रदीर्घ कारावास भोगलेल्या या आरोपींचा जामीन अर्ज मी स्विकारत आहे. आणखी एक आरोपी वीरेंद्रसिंह तावडेच्या जामीन अर्जावर स्वतंत्रपणे सुनावणी होणार आहे.
‘मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींचा जामीन मंजूर झाल्यानंतर पानसरे कुटुंब सर्वोच्च न्यायालयात जाणाच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. वकिलांचा सल्ला घेऊन लवकर निर्णय घेणार असल्याची माहिती स्नुषा मेघा पानसरे यांनी दिली आहे.