Saturday , June 14 2025
Breaking News

मॉन्सून लांबला!

Spread the love

पुणे : चार दिवसांपूर्वी अंदमानमध्ये जोरदार प्रवेशानंतर वेगाने भारताकडे कूच करणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वारे मंदावल्याने मॉन्सूनचा पाऊस लांबला आहे. सध्या या वाऱ्याला पुढे येण्यास पोषक स्थिती नसल्याने मान्सूनला खीळ बसली आहे. परिणामी १ जून रोजी केरळमध्ये येणारा मॉन्सून ३ जूनपर्यंत लांबणार आहे.
अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळ ओसरल्यानंतर मोसमी वारे सक्रीय झाले होते. २१ मे रोजी मोसमी वाऱ्याने अंदमान आणि निकोबार बेटांवर प्रवेश केला. दुसऱ्याच दिवशी २२ मे रोजी श्रीलंकेपर्यंत हे वारे पोहोचले. बंगालच्या उपसागरातील मोठा भाग मोसमी वाऱ्याने एकाच दिवसात व्यापला तर २५ मेपर्यंत श्रीलंकेच्या निम्म्या भागात वारे पोहोचले मात्र, याच कालावधीत त्यांची एक दिवसाआड प्रगती होत राहिली. २७ मे रोजी कोमोरीन आणि मालदिवचा बराचसा भाग त्यांनी व्यापला. परंतु त्यानंतर ३० मेपर्यंत वाऱ्याचा वेग कमी झाला असून त्यामुळे मॉन्सूच्या हालचालींवर परिणाम झाला आहे.
सक्रीय मोसमी वाऱ्यामुळे एक जूनचे केरळमधील नियोजित आगमन एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी होईल, असा हवामान विभागाचा अंदाज होता. त्याचवेळी चार दिवस पुढे-मागे होण्याची शक्यताही गृहीत धरली होती.
सध्या मोसमी वाऱ्यांची प्रगती थांबली असली तरी १ जूनला पोषक स्थिती निर्माण होऊन त्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार केरळमध्ये त्यांचे आगमन तीन जूनला होईल, तर महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांत मॉन्सूनचे आगमन होईल, असे सांगण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

विमान थेट हॉस्टेलच्या इमारतीवर आदळले; 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू?

Spread the love  अहमदाबाद : विमान अपघाताची एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *