
बेळगाव : रायान्ना नगर मजगाव येथील अब्दुलमुनाफ मैजूउद्दीन तिकडी या मटका बुकीला पोलिसांनी बेळगाव जिल्ह्यातून हद्दपार करून हावेरी येथे हलवण्यात आले.
अब्दुलमुनाफ तिकडी या व्यक्तीवर 2011 पासून आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी याला न्यायालयाने शिक्षाही दिली आहे. इतके असून देखील अब्दुलमुनाफ तिकडी हा उद्यमबाग परिसरातील रोज कमून खाणाऱ्या कामगारांना मटका खेळण्यासाठी प्रवृत्त करत होता. त्याला वेळोवेळी चितवणी देऊन देखील आपला व्यवसाय काही त्यांनी सोडला नाही.
याची कारवाई म्हणून पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या आदेशानुसार उद्यमबाग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुंगी यांनी गुरुवारी रात्री ही कारवाई करून त्याला बेळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.