बेळगाव : कोरोनाच्या या भयंकर परिस्थितीमध्ये बेळगावमधील विविध संघटना प्रशासनाची कोणतीही मदत नसताना उल्लेखनीय कार्य करत आहेत, लोकांचे जीव वाचवायचे असोत किंवा मृत रुग्णांचा सन्मानाने अंत्यविधी असो सर्व कोरोना योद्धे दिवसरात्र झटत आहेत. अश्याच कोविड योद्ध्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पीपीई किट देण्यात आले. श्रीराम सेना हिंदुस्थानचे सचिन चव्हाण, शंकर पाटील व इतर कार्यकर्ते तसेच हेल्प फॉर निडीचे सुरेंद्र अनगोळकर यांच्याकडे हे पीपीई किट देण्यात आले. यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, पदाधिकारी सागर पाटील, संतोष कृष्णाचे आदी उपस्थित होते.
Check Also
युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक …