खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मिराशी वाटरे गावच्या नागरिकांनी कचरा डेपो विरोधात तहसीलदाराना निवेदन सादर केले.
मिराशी वाटरे सर्वे नंबर ८ मधील गायरानमध्ये मोहिशेत ग्राम पंचायतीच्यावतीने कचरा डेपोचे नियोजन करण्यात येत आहे. याला मिराशी वाटरे ग्रामस्थांचा विरोध असून याठिकाणी कचरा डेपो होऊ देणार नाही, असे निवेदन मिराशी वाटरे ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन उपतहसीलदार आर. के. कोलकार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मिराशी वाटरे गावच्या सर्वे नंबर ८ मधील गायरान माळावर मोहिशेत ग्राम पंचायतीने कचरा डेपोचे आयोजन केले आहे. मात्र जनावरासाठी चरायला इतरत्र जागा नाही. या परिसरात महादेवाचे मंदिर आहे. असे असताना याभागात कचरा डेपोला मंजुरी देऊ नये. अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदाराना दिले.
यावेळी उपतहसीलदार आर. के. कोलकार यांनी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडवू असे आश्वासन दिले.
यावेळी मिराशी वाटरे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते..
