Saturday , December 7 2024
Breaking News

अनैतिक संबंधात अडथळा ठरल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून पतीचा खून

Spread the love

बेळगाव : यरगट्टी तालुक्यातील मुगलीहाळ गावात, पत्नीने कट रचून तिच्या पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात पतीचा अडसर निर्माण झाल्याने त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याने त्याचा खून केल्याची घटना यरगट्टी तालुक्यातील मुगलीहाळ गावात घडली आहे. लक्ष्मण तिप्पण्णा मुंजी (३८) याचा खून करण्यात आला आहे.

बुधवारी दुपारी मृत लक्ष्मणच्या शेतघरात त्याची पत्नी उद्धवा लक्ष्मण मुंजी आणि तिचा मल्लिकेरी गावातील प्रियकर अर्जुन अरेरा या दोघांनी मिळून हा खून केला. या दोघांचं अनैतिक संबंधात अडथळा लक्ष्मण मुंजी अडसर ठरत होता. त्याचा खून करण्याच्या उद्देशाने पत्नीने तिच्या प्रियकराला फोन करुन घरी बोलावून घेतले आणि त्याचा खून केला. खुनाची वाच्यता होऊ नये यासाठी म्हणून मृतदेह बाईकवरून नेऊन घटप्रभा कालव्यात तो मृतदेह मोटारसायकलसह फेकून देण्यात आला आणि मोटारसायकलला अपघात झाल्याचे भासवले.

या घटनेसंबंधी मृताचा भाऊ बाळाप्पा तिप्पण्णा मुंजी याने मुरगोड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. घटनास्थळी डीवायएसपी रामनगौडा हट्टी, सीपीआय मंजुनाथ नडवीनमनी आणि पीएसआय प्रवीण गंगोली यांनी भेट देऊन पाहणी केली. आरोपींना लवकरच अटक केली जाईल असा भरवसा त्यांनी दिला.

About Belgaum Varta

Check Also

बिजगर्णी शिक्षण संस्थेबाबत आदेशाला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Spread the love  पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचा वाद बेळगाव : बिजगर्णी येथील पश्चिम विभाग शिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *