नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, लसीकरण केंद्रांपर्यंत जाण्यास असमर्थ असलेल्या अपंग आणि असहाय्य लोकांना घरपोच लस दिली जाणार आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी ही माहिती दिली. याबाबत नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी माहिती दिली की, गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची 31 हजार प्रकरणं समोर आली आहेत. यामधील बहुतेक प्रकरणं ही केरळ आणि महाराष्ट्रातील आहेत. गेल्या आठवड्यात एकूण प्रकरणांपैकी 62.73 टक्के एकट्या केरळमधील आहेत. परंतू संसर्गाच्या एकूण प्रकरणांमध्ये घट झाली आहे. सातत्यानं 12व्या आठवड्यात संसर्गाच्या दरात घट झाली आहे. हा रेट तीन टक्क्यांहून कमी आहे. तर रिकव्हरी रेट 97.8 टक्के आहे.
