पणजी : राज्यातील पंचायतींच्या निवडणुका पावसाळ्यानंतर अर्थात तीन महिन्यानंतर घेतल्या जातील. कारण पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नाही आणि दुसरे कारण म्हणजे ओबीसी प्रभाग आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश.
गोवा सरकारने राज्य निवडणूक आयोगाला ओबीसी आरक्षणाबाबत ट्रिपल टेस्ट प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. तसा प्रस्ताव गोवा सरकारने राज्य निवडणूक आयोगाला दिलेला आहे. राज्य निवडणूक आयोग त्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण करून गोवा सरकारला कळवणार आहे. निवडणुकांची तारीख राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहीर होणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (दि. २५) पणजी येथे एका कार्यक्रमानंतर बोलताना दिली. त्यामुळे राज्यातील निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या जाणार हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, पंचायत निवडणुकांना उशीर होणार असल्यामुळे पंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
Check Also
हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर ‘आप’ला शून्य जागा
Spread the love हरियाणा : हरियाणात शनिवारी निवडणुकीची धामधूम संपली आहे. मतदान पार पडल्यानंतर एक्झिट …