Friday , October 25 2024
Breaking News

शरद पवार राष्ट्रपती पदासाठी योग्य : संजय राऊत

Spread the love

उत्तम प्रशासक हवा की रबर स्टॅम्प हे भाजपवर अवलंबून
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपती पदाबाबत वक्तव्य करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अनुभव राष्ट्रपती पदासाठी योग्य आहे, असं म्हटलं आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटलं की, ’देशाला राष्ट्रपती हवे असतील तर शरद पवार आहेत, रबर स्टॅम्प तर अनेक रांगेत आहेत. राष्ट्रपती पद कुणाला द्यायचं राज्यकर्त्यांवर आहे. देशाला एक आदर्श राष्ट्रपती हवा असेल, उत्तम प्रशासक हवा असेल तर सरकारनं राष्ट्रपती निवडावा, रबर स्ट्रम्प निवडू नये.’
’शरद पवार देशातील प्रमुख नेते आहेत. सगळ्यात अनुभवी नेते आहेत. संसदीय लोकशाहीमध्ये गेली 50 वर्ष अजिंक्य असलेले नेते आहेत. राज्यकर्त्यांचं मन मोठं असेल तर ते राष्ट्रपती निवडतील, नाहीतर खुजे लोक निवडतील. पण अर्थात शरद पवार यांनी या सर्वाला मान्यता दिली तर या गोष्टी शक्य आहेत.’, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत सध्या अयोध्येत आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आगामी अयोध्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर राऊत अयोध्येत तयारीची पाहणी करत आहेत.
दरम्यान मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या सरकारी मेगा भरतीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मेगा भरतीच्या निर्णयाचे स्वागत करतो असं राऊत यांनी म्हटलं आहे. ’पंतप्रधान मोदी यांनी निवडून आल्यावर दोन कोटी रोजगार देण्याची हमी दिली होती. त्यानंतर भाजपनं पाच कोटी रोजगार देण्याचा दावा केला, मात्र पूर्ण केला नाही. आता मोदी यांनी दिलेलं वचन पाळण्याची गरज आहे’, असं राऊत म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर : ३८ जणांची नावे

Spread the love  मुंबई : भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आज (बुधवार, ता. २३) राष्ट्रवादी अजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *