Thursday , April 17 2025
Breaking News

राष्ट्रपती निवडणूक: तयारीची धुरा आता शरद पवारांकडे; लवकरच होणार विरोधकांची बैठक

Spread the love

नवी दिल्ली : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोपर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधीपक्षांची राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा होणार आहे. त्यासाठी दिवस आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीला 17 विरोधीपक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
खुद्द शरद पवारांनाच विरोधीपक्षांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होण्याची विनंती केली होती. पण त्यांनी आपल्याला अजूनही सक्रीय राजकारणात कार्यरत रहायचं असल्याचं सांगत या ऑफरला नम्रपणे नकार दिला होता. पण आता शरद पवार राष्ट्रपतीपदासाठीचा नवा उमेदवार निवडीमध्ये महत्वाचा वाटा बजावणार आहेत. त्यामुळेच त्यांच्या अध्यक्षतेखाली 21 जून रोजी विरोधीपक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. पार्लमेंट अनेक्स इथं दुपारी अडीच वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला सुमारे 17 विरोधीपक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्य मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या दिल्लीतील बैठकीत शरद पवारांनी नकार दिला होता. त्यानंतर विरोधकांकडून सर्वसंमतीनं एकच उमेदवार देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. याची माहिती देताना सुधींद्र कुलकर्णी म्हणाले होते, विरोधीपक्षांनी ठराव केला की, आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वांच्या सहमतीनं एकच उमेदवार देण्यात येईल. राष्ट्रपतीपदासाठीचा हा उमेदवार संविधानाचा संरक्षक म्हणून काम करेल. तसेच मोदी सरकारला भारतीय लोकशाही आणि भारताच्या सामाजिक बांधणीचं आणखी नुकसान करण्यापासून रोखू शकेल.
ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या, या बैठकीला अनेक विरोधीपक्ष एकत्र आले आहेत. आम्ही ठरवलंय की एकमतानं उमेदवार निवडायचा. प्रत्येकजण या उमेदवाराला आपलं समर्थन देईल. आम्ही इतरांशीही याबाबत चर्चा करु. ही चांगली सुरुवात आहे. अनेक महिन्यांनंतर आम्ही एकत्र चर्चेसाठी बसलो आहोत आणि आम्ही पुन्हा एशा बैठका आम्ही करु. आम्ही सर्वांनी शरद पवारांचं नाव घेतलं पण त्यांनी याला नकार दिला. आम्ही त्यांना यावर पुनर्विचार करायला सांगितलं आहे, पण त्यांचा नकार कायम राहिला तर नव्या व्यक्तीचा विचार केला जाईल.

About Belgaum Varta

Check Also

26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणले

Spread the love  नवी दिल्ली : 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *