पणजी: दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी आज अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पणजी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने शुक्रवारी उत्पल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली ज्यामध्ये उत्पल यांचे नाव नव्हते.
