Saturday , July 27 2024
Breaking News

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला मिळणार्‍या प्रतिसादातून ‘समाजाला सत्य पहायला आवडते’ हेच दिसून आले! : भाषा सुंबली, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातील अभिनेत्री

Spread the love


‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाने भारतात मोठी क्रांती निर्माण केली आहे. 32 वर्षे जे सत्य जनतेपासून लपवण्यात आले होते ते लोकांसमोर आल्याने मोठी जागृती झाली आहे. या चित्रपटानंतर प्रदर्शित झालेल्या अनेक मोठ्या चित्रपटांकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. यातून लोक काय पाहू इच्छितात, लोकांना काय आवडते, हे लोकांनी स्पष्ट केले आहे. ‘सब चलता है’ असे नसून ‘केवल सच चलता है!’ (केवळ सत्य पहायला आवडते) हे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला मिळणार्‍या अभूतपूर्व प्रतिसादातून दिसून आले, असे स्पष्ट प्रतिपादन ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात ‘शारदा पंडित’ या पीडीत हिंदु महिलेची भूमिका साकारणार्‍या प्रसिद्ध अभिनेत्री भाषा सुंबली यांनी केले. त्या हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘द कश्मीर फाइल्स’ला हिंदु समाजाची साथ : काय आहे अभिनेत्यांच्या मनातील विचार?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होत्या.
अभिनेत्री भाषा सुंबली पुढे म्हणाल्या की, हा चित्रपट ‘काश्मिरमध्ये जे झाले, ते भारतात इतर ठिकाणी होऊ नये’, यासाठीही जागृती करत आहे; पण ज्या लोकांना सत्य नको हवे आहे. ज्या लोकांनी काश्मिरी हिंदूंचा नरसंहार केला आहे, ज्यांना हा नरसंहार लपवायचा आहे, तेच लोक या चित्रपटाला विरोध करत आहेत. या चित्रपटामुळे देशभरात जागृती झाल्याने हा विषय संपला असे नाही, तर यातून केंद्र सरकारने कृतीशील होऊन काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी भूमिका पार पाडली पाहिजे.
यावेळी अभिनेता तथा लेखक श्री. योगेश सोमण म्हणाले की, काश्मीरच्या विषयावर यापूर्वी ‘हैदर’, ‘मिशन कश्मीर’, ‘रोजा’ आदी अनेक चित्रपट आले; मात्र या चित्रपटांतून काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार दाखवण्याऐवजी एकांगी बाजू दाखवण्यात आली. आतंकवाद्यांप्रती सहानुभूती निर्माण करण्यापासून ते भारतीय सैन्य काश्मीरमध्ये कसे अत्याचार आहे, हे दाखवण्यात आले. त्यामुळे ते चित्रपट लोकांच्या पसंतीला उतरले नाहीत. याउलट सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती दाखवल्यामुळे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट लोकांच्या पसंतीला उतरला आहे. ‘उरी’, ‘द कश्मीर फाइल्स’ असे चित्रपट मोदी सरकारच्या प्रचारासाठी बनवल्याचा आरोप होत असेल, तर आधीचे चित्रपट हे काँग्रेस आणि तत्कालीन राज्यकर्ते यांच्या प्रचारासाठी बनवले होते काय? ‘हैदर’ चित्रपटाच्या प्रभावामुळे त्यातील एक कलाकार नंतर आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी झाला. विशिष्ट विचारधारा लोकांवर लादण्याचे काम आधी झाले असेल, तर आता दुसरी बाजू लोकांसमोर आली पाहिजे. या चित्रपटामुळे डाव्या विचारसरणीचे, पुरोगामी, उदारमतवादी लोक चिंतित झाले आहेत; कारण त्यांनी मांडलेल्या खोट्या इतिहासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोक त्यांच्या पुस्तकावर अनेक प्रश्न विचारत आहेत, असेही श्री. सोमण म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद

Spread the love  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *