Saturday , July 27 2024
Breaking News

निपाणी पालिकेची सभा वादळी ठरण्याची चिन्हे!

Spread the love

13 रोजी सर्वसाधारण सभा : तब्बल 26 विषयांवर होणार चर्चा
निपाणी : तब्बल दोन वर्षांपासून निपाणी पालिका सभागृहाला नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांची प्रतीक्षा होती. ती प्रतिक्षा संपुष्टात आल्यानंतर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा कधी होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. आता मुहूर्त ठरला असून मंगळवारी (ता.13) 11 वाजता ही सभा होणार आहे. त्यामध्ये तब्बल 26 विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जाणार आहेत. पालिकेच्या विद्यमान सभागृहाची ही तिसरी सर्वसाधारण सभा असून गेल्या दोन सभांमधील वादळी चर्चा लक्षात घेता या सभेतही काही विषयांवर वादळी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंगळवारच्या सभेमध्ये 26 फेब्रुवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेतील ठराव वाचून दाखवणे. यावर्षीच्या एप्रिल ते महिन्यापर्यंत झालेल्या जमाखर्चावर चर्चा करून मंजुरी घेणे, एसटीपीसाठी जागेबाबत विचार करून मंजुरी घेणे, निपाणी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जवाहर तलावामधील साचलेला गाळ काढण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, आश्रय योजनेतून घरकुल निर्मिती होणारी यमगर्णी हद्दीतील जागा बदलण्याबाबत निर्णय घेणे, विविध योजनेतून मंजूर झालेल्या कामांसाठी आलेल्या कमीत कमी किमतीच्या निविदांवर विचार करून मंजुरी घेणे, 2021-22 सालासाठी व एसएफसी, एससीपी, टीएसपी अनुदानावर विचार करून मंजुरी घेणे, 15 व्या वित्त आयोगातील अनुदानाबाबत विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे. नगराध्यक्षांच्या परवानगीने विविध कामे व निविदांवर विचार करून मंजुरी घेणे, सर्वे क्रमांक 14 नांगनूर हद्दीतील जागा तालुका क्रीडांगण बांधण्यासाठी क्रीडा विभागाला पत्र देण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, म्युनिसिपल हायस्कुल सरकारला हस्तांतरित करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, राजा शिवछत्रपती संस्कृतिक भवनाचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी चर्चा करून निर्णय घेणे, शहरात विविध ठिकाणी रस्त्याशेजारी फलक उभारण्याबाबत चर्चा तसेच आयडीएसएमटी निधीतून शहरातील विविध ठिकाणी व्यावसायिक गाळे उभारण्यासाठी चर्चा बेंगलोर, बालभवन सोसायटीच्यावतीने जवाहरलाल तलाव परिसरात बालभवन व लहान मुलांसाठी मिनी ट्रेन सुविधा उभारण्याबाबत विचार करून मंजुरी घेणे, घनकचरा निर्मूलन प्रकल्प खाजगी एजन्सीना चालविण्यास देणेबाबत चर्चा करण्यात येणार आहे. घरफाळा वसुली सोईस्कर करण्यासाठी नगरपालिकेत कर विभागात सिंगल विंडो सिस्टीम सुरू करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
सन 2021-22 सालासाठी नगरपालिकेच्या 24 टक्के, 725 व 5 टक्के मधील कृती आराखडा विचार करून मंजूर करणे, 2019-20 च्या एसएफसी 5 टक्के योजनेच्या कृती आराखड्यातील बदलावर विचार करून निर्णय घेणे, टॅक्स कन्सल्टंट व पीएफ कन्सल्टंट यांच्या नेमणुकीबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत.
—-
सत्ताधार्‍यांना घेरण्याची तयारी
सर्वसाधारण सभेत 26 विषय मांडले जाणार असल्यामुळे अनेक विषयांवर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. म्युनिसिपल हायस्कुल सरकारला हस्तांतरित करण्याचा विषय, विविध योजनेची कामे व निविदांना मंजुरी देताना सत्ताधार्‍यांना विरोधकांचा सामना करावा लागणार आहे. त्याचबरोबर विरोधकांकडूनही सत्ताधार्‍यांना घेरण्याची तयारी केली जात असल्याचे वृत्त आहे.

About Belgaum Varta

Check Also

व्हटकर कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

Spread the love  निपाण (वार्ता) : येथील जत्राट वेस मधील रहिवासी तिरुपती व्हटकर यांच्या अंगावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *