कागल तालुका शिवसेनेची मागणी : मंडल पोलीस निरीक्षक शिवयोगी यांना निवेदन
निपाणी (वार्ता): महाराष्ट्रातील एस.टी.ना कर्नाटकात प्रवेश द्यावा, अशा मागणीचे निवेदन कागल तालुका शिवसेनेच्या वतीने निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांना देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, कर्नाटक निपाणी सीमाभागात असलेल्या महाराष्ट्रातील कागल तालुक्यातील हमिदवाडा, कौलगे, बस्तवडे, चिखली, लिंगनूर, मुरगुड, गलगले, अर्जुनी ही गावे निपाणीला लागून आहेत त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगत असलेल्या गावातील नागरिक व्यापारी, शालेय विद्यार्थी, महाराष्ट्र-कर्नाटक असा प्रवास करत असतात. पण गेल्या काही दिवसापासून कर्नाटकचे पोलीस इथे थांबत असल्याने या मार्गावरून मुरगुड – निपाणी एसटी बसला कर्नाटकात प्रवेश बंदी असल्यामुळे महाराष्ट्र एसटीची कर्नाटक पोलीस अडवणूक करतात.
त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना लिंगनूर येथे उतरून पाच-सहा किलोमीटर चालत कर्नाटकच्या देवचंद कॉलेजमध्ये जावे लागते. शिवाय अनेक प्रवासी निपाणीला जाणारे देखील या ठिकाणी उतरून चालत जात आहेत. त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल आणि शालेय विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहून संबंधित कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एसटीला कर्नाटकात प्रवेश द्यावा असे म्हटले आहे.
यावेळी कागल तालुका शिवसेना प्रमुख अशोकराव पाटील (बेलवळेकर) यांनी निपाणीचे सीपीआय संगमेश शिवयोगी यांना निवेदन दिले. या निवेदनावर कोल्हापूर जिल्हा मनसेचे उपाध्यक्ष रोहन निर्मळे, मानवाधिकार संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष जयसिंग टिकले यांच्या सह्या आहेत.
Check Also
श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …