Wednesday , July 24 2024
Breaking News

महांतेशआण्णा कवठगीमठ यांच्या प्रचारार्थ सौंदलगा येथे सभा संपन्न

Spread the love

सौंदलगा : आडीमल्लया देवस्थान येथे विधान परिषद निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, नगरसेवक, नगरसेविका यांचा मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे यांनी सर्वांचे स्वागत केले. तर प्रास्ताविकात भाजप ग्रामीण अध्यक्ष पवन पाटील यांनी महांतेशआण्णा कवठगीमठ यांना निवडून देऊन, भारतीय जनता पक्ष विधान परिषदेत बळकट करा असे सांगितले. भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नेर्ले यांनी सांगितले की, कर्नाटकमध्ये विधानपरिषदेच्या 25 जागेसाठी निवडणूक होत असून विधान परिषदेमध्ये आपले बहुमत बळकट करण्यासाठी महांतेशआण्णा कवठगीमठ यांना निवडून द्यावे.
खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले की, बेळगाव जिल्ह्यामध्ये भाजपचे उमेदवार म्हणून महांतेशआण्णा कवठगीमठ हे एकमेव उमेदवार आहेत. त्यांना आपण प्रथम क्रमाकांचे मत देऊन विधानपरिषदेसाठी निवडून देऊ. देशात व राज्यात सकारात्मक बदल घडवून येत असून यासाठी भाजप कार्य करीत आहे. हे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी भाजप उमेदवार महांतेशआण्णा कवठगीमठ यांना जास्तीत जास्त मतदान करावे व निवडून द्यावे, असे आवाहन केले. यानंतर मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या की भाजप हा सर्व पक्षा पेक्षा वेगळा पक्ष असून भाजपमध्ये राष्ट्रप्रथम मानले जाते. त्यानंतर पक्षाचा विचार केला जातो. महांतेशआण्णा कवठगीमठ यांना मतदान करणे म्हणजे विकासाला मतदान करण्यासारखे आहे. पूर्वी विकास कसा असतो हे सांगावे लागत होते. पण आता भाजपमुळे ग्रामीण भारताचा चौफेर विकास होत आहे. 25 उमेदवारांच्या पैकी 20 उमेदवार भाजपने दिले असून 17 उमेदवार निवडून येतील त्यात महांतेशआण्णा कवठगीमठ आघाडीवर असतील, असा आम्हाला विश्वास आहे. निपाणी मतदार संघातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, नगरसेवक, नगरसेविका हे प्रथम पसंतीचे मत महांतेशआण्णा कवठगीमठ यांना देतील यात शंका नाही असे सांगितले.
यावेळी विधान परिषद उमेदवार महांतेशआण्णा कवठगीमठ म्हणाले की, ही निवडणूक महत्त्वाची आहे. देशात मोदी सरकार व राज्यात बोम्माई सरकार आहे. देशात मोदी सरकारने विविध विकासकामे करून बदल घडविला आहे. राज्यात बोम्माई सरकार अनेक विकास कामे राबवीत आहे. खानापूरच्या लोढ्यांपासून अथणीच्या शेवटच्या भागापर्यंत 450 किलोमीटर व्याप्ती असलेला मतदार संघात 1800 गावे येतात. मात्र सेवा करण्याचा ध्यास असल्यास विकास होऊ शकतो. हे मागील 12 वर्षाच्या काळात दाखवून दिले आहे. गेली 12 वर्ष आपण विधान परिषद सदस्य म्हणून विविध प्रश्न विचारून विकासकामे मार्गी लावली आहेत. एकूण 506 ग्रामपंचायत पैकी 400 ग्रामपंचायतींना भेट दिली आहे. कोविडमध्ये सुद्धा मी जनतेसाठी काम केले आहे. यासाठी येणार्‍या दहा तारखेच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये मला प्रथम क्रमांकाचे मत देऊन विजयी करा. यावेळी मलगोंडा पाटील (बंदूक), मारुती हवालदार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष सरोजनी जमदाडे, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडी, हालशुगर चेअरमन चंद्रकांत कोठीवाले, पी.एल.डी. बँक अध्यक्ष एस. एस. ढवणे, एपीएमसी अध्यक्ष अमित साळवे, तात्या नाईक, किरण निकाडे, बंडा घोरपडे, गणपती गाडीवड्डर, आनंदा सुरवशे यासह ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य सदस्या, नगरसेवक, नगरसेविका, भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी आभार भाजपचे शहराध्यक्ष प्रणव मानवी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी – सुळगाव बसच्या वेळेत बदल करण्याची मागणी

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणीहून सुळगावला जाण्यासाठी संध्याकाळी ६ वाजता बस आहे. पण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *