निपाणी (वार्ता) : रासाई शेंडूर येथे ग्रामपंचायत अध्यक्ष बाजीराव भोसले आणि संघाचे अध्यक्ष ऑनरेरी सुभेदार मेजर युवराज साळुंखे यांच्या हस्ते श्री. भैरवनाथ सैनिक संघाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पूजा घालण्यात आली. त्यानंतर संघाच्या नाम फलकाचे अनावरण ज्येष्ठ सदस्य रावसाहेब गायकवाड यांच्या हस्ते झाले.
मेजर युवराज साळुंखे यांनी, भारत मातेचे रक्षण करून निवृत्तीचे उर्वरित आयुष्य समाधानाने व सामाजिक कार्यात वाहून घेऊन जगण्यासाठी प्रत्येक माजी सैनिकाची इच्छा असते.
या विचाराने प्रेरित होऊन श्री भैरवनाथ सैनिक संघाची स्थापन केला आहे. सर्वांच्या सहकार्याने संघाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम हाती घेणार असल्याचे सांगितले. यावेळी संघाचे अध्यक्ष गणपती सुर्यवंशी, उपाध्यक्ष भुजंग डवरी, सेक्रेटरी अशोक वाडेकर, खजिनदार शंकर मिसाळ, शिवाजी आंबोले यांच्यासह संघाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta