पोलिसांची कारवाई : एक जण ताब्यात
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामध्ये ७ लाख ५० हजार रुपये सापडल्याची घटना शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी तपासणी नाक्यावर पुण्याहून चिक्कमंगळूरकडे जात असणाऱ्या गणेश ट्रॅव्हल्स बसची तपासणी करण्यात आली. यावेळी बसमध्ये असणाऱ्या एम. एन. उदयशंकर यांच्याकडे ७ लाख ५० हजार रुपये असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचनामा केला.
निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, उपनिरीक्षक कृष्णा नाईक, उपनिरीक्षक रेवांना गुरीकार, शिवानंद चिकमट, शिवप्रसाद किवडनावर, अमर चंदनशिव, संदिप गाडीवडर आदी कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta