संजयबाबा घाटगे : निपाणीत वधू-वर परिचय महामेळावा
निपाणी : गेल्या काही वर्षापासून वंशाचा दिवा असावा यासाठी शहर आणि ग्रामीण भागात स्त्रीभ्रूणहत्या सुरू आहे, त्यामुळे समाजात मुलींची संख्या घटत आहे.
परिणामी अनेक तरुणांना विवाहासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय सोशल मीडियामुळे नातेवाईकांचा संपर्कही कमी झाला आहे. परिणामी मुला-मुलींचा समाजातील समतोल बिघडला जात आहे. त्यामुळे आता वधू-वर पालक मेळावा महत्वपूर्ण बनली असून नेहमी मातृत्वाचा आदर करावा, असे आवाहन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले. येथील शुभकार्य वधूवर सुचक केंद्रातर्फे आयोजित मराठा वधू-वर परिचय महामेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयवंत भाटले होते.
प्रारंभी नगराध्यक्ष बाटले व व्यासपिठावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज नितीन शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी, समाजात मुलींचा जन्मदर कमी होत असून त्याचा भविष्यातील घडामोडीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे आतापासूनच समाजातील नागरिकांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. यावेळी प्रा. एन. आय. खोत यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
संजयबाबा घाटगे यांना जिद्दी, झुंजार नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याशिवाय दादासाहेब खोत यांची राज्यस्तरीय न्यायनिवाडा कमिटी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास नगरसेवक रविंद्र शिंदे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, टाऊन प्लॅनिंग कमिटीचे माजी अध्यक्ष गोपाळ नाईक, चिकोडी तालुका रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार, निकु पाटील, नगरसेविका दिपाली गिरी, उपासना गारवे, उत्तम सांगावकर, माजी नगरसेवक विजय टवळे, भूषण रेपे, सुभाष पाटील, शिवाजी निंबाळकर, दत्तात्रय मांजरेकर, सुरेश कोरे, महावीर पाटील ,नामदेव जाधव, दिलीप रेपे, तेजश्री जाधव डॉ. संकेत पाटील, बाहुबली पाटील, सतीश कारंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. एस. एस. परीट यांनी सूत्रसंचालन केले.
Check Also
पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …