निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.५) सकाळी उघडकीस आली. शिवाजी बबन निकम (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत इचलकरंजी येथील गावभाग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शिवाजी निकम हा शनिवारी (ता.३) बोरगाव येथे आपल्या घरी काही कारणामुळे विष प्राशन केले होते. शिवाजी हा विष प्राशन केल्याचे समजताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल उपचारासाठी दाखल केले होते. प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना निरामय या ठिकाणी पुढील विचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचाराला साथ न मिळाल्याने सोमवारी (ता.५) शिवाजी मृत झाल्याचे वैद्याधिकाऱ्यांनी सांगितले. अत्यंत मन मिळावू स्वभावाच्या शिवाजी यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही आत्महत्येचे नेमके कारण गुलदस्त्यात आहे.
इचलकरंजी येथील गावभाग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून शवाविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
शिवाजी हा मानकापूर येथील घोडावत पान मसाला या ठिकाणी काम करीत होता. अत्यंत कष्टाने आपला संसार चालवित क्रिकेट खेळात त्याला मोठी आवड होती. क्रिकेट प्रेमी त्यांना लारा म्हणून ओळखत होते. लाडका लारा आपल्यातून निघून गेल्याने क्रिकेट क्लबच्या वतीने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे निकम कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
शिवाजी यांच्या मागे पत्नी, दोन मुली, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta