आशिषभाई शाह; देवचंद महाविद्यालयात सत्कार समारंभ
निपाणी (वार्ता) : शालेय जीवनात कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट मार्गदर्शन असेल तरच पुढील खडतर प्रवास सुखकर होईल. यामध्ये पालकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. या पंचक्रोशीतील शाळांचे देवचंद महाविद्यालयांशी असलेले ऋणानुबंध आजही अखंडीत आहेत. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून महाविद्यालय व आपण नेहमीच कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष शाह यांनी केले.
अर्जुननगर ता कागल येथिल देवचंद महाविद्यालयात सीमाभागातील माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक, गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
उपाध्यक्षा डॉ. तृप्ती शाह, प्राचार्य डॉ. जी. डी. इंगळे, डॉ. पी. डी. शिरगावे उपस्थित होते.
उपाध्यक्षा डॉ. तृप्तीभाभी शाह म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालक आणि शिक्षकांचे योगदान खूपच महत्त्वाचे असते आणि म्हणूनच आम्ही महाविद्यालयातर्फे मुख्याध्यापक आणि त्यांना घडवणारे पालक व विद्यार्थी यांचा सत्कार आयोजित केला.
स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांनी केले महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांची माहिती प्रा. डॉ.किशोर गुरव यांनी करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कृष्णामाई कुंभार व प्रा. विष्णू पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन उपप्राचार्य अशोक पवार यांनी केले. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रभाकर जाधव, प्रा. एस. पी. जाधव, डाॅ. अशोक डोनर, छात्रसैनिक, मुख्याध्यापक, पालक, गुणवंत विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta