युवा नेते उत्तम पाटील : विविध ठिकाणी बैठकीत मार्गदर्शन
निपाणी : पुढील राजकारणाच्या दृष्टीने विधानपरिषद निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लखन जारकीहोळी हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आतापर्यंत जारकीहोळी कुटुंबावर सर्वच मतदारांनी प्रेम केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये या कुटुंबातील सदस्यांचा दबदबा कायम आहे. आपल्या राजकीय जीवनामध्ये जारकीहोळी बंधूंनी जिल्ह्यामध्ये अनेक विकासकामे केली आहेत.
यापुढील काळात निपाणी विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी लखन जारकीहोळी हे एकमेव पर्याय आहेत. त्यामुळे मतदार बंधुनी त्यांनाच पहिल्या पसंतीचे मत देऊन विजय करावे. या मतदारसंघात त्यांना मताधिक्क्याने निवडून देऊ अशी ग्वाही बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली.
निपाणी विधानसभा मतदारसंघातील अक्कोळ, गळतगा, बारवाड, ढोनेवाडी, मानकापूर, लखनपुर, जत्राट, अकोळ, पडलिहाळ, बेनाडी, शिरगुप्पी परिसरातील ग्रामपंचायत सदस्यांची भेट घेऊन आयोजित बैठकीत ते बोलत होते.
उत्तम पाटील म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत तिरंगी लढत असली तरी बंधूनी केलेले काम अविस्मरणीय आहे. त्यांचा सक्रिय सहभाग आहे. लखन जारकीहोळी हे निवडून आल्यानंतर निपाणी भागावर विशेष लक्ष केंद्रित करणार आहेत. त्यांच्या सहकार्याने मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
याशिवाय आर्यन ते उद्योग समूहाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोणत्याही आमिषाला बळी न पडता लखन जारकीहोळी यांना निवडून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकांना अकोळ येथील ग्रामपंचायत अध्यक्ष इंद्रजित सोळांकूरे, उपाध्यक्षा अनिता मुधाळे, सदस्य श्रीकांत कोळी, दीपक कोळी,सुरेश मोहिते, स्वाती मगदूम, चेतन स्वामी, चंद्रकांत मुधाळे, अनिल पाटील, बाळू घस्ते, ममदापूर येथील निरंजन पाटील, गजानन कावडकर, गळतगा येथील संजय कागे, आनंद गिंडे, शिवू पाटील, जत्राटमध्ये ग्रामपंचायत अध्यक्ष रोहन भीवसे, माजी अध्यक्ष रमेश भिवसे, शिवाजी रानमाळे, संजय पाटील, संजय करनुरे, गंगुबाई नाईक, श्रीनिवास कोळी, प्रशांत चेंडके, राणी कांबळे, शांताराम कोळी, लखनापूर येथील अनिल पाटील, रुक्मिणी भोसले, लक्ष्मी मगदूम, बेबीजान शिरकोळी, पडलिहाळ येथील संजय स्वामी, संभाजी पाटील, संजय जाधव, संतोष मोरे यांच्यासह निपाणी मतदारसंघातील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
