अध्यक्ष सुरेश शेट्टी : 31 वी वार्षिक सभा
निपाणी : शहरात स्थापन होऊन ग्रामीण भागाकडे झेपावून सक्षम झालेल्या व सर्वसामान्यांच्या अर्थवाहिनी असा नावलौकिक मिळवलेल्या राज्यात सहकार क्षेत्रात आदर्श ठरलेल्या श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेचे संचालक मंडळाचे मार्गदर्शन, प्रभावी व्यवस्थापन व सेवकांचे परिश्रम यांच्या जोरावर कोरोना काळातही संस्थेमध्ये 58 कोटींनी ठेवी मध्ये वाढ झाली आहे. यावरून कोरोना काळातही ग्राहकांच्या संस्थेवर विश्वास वाढला असल्याचे स्पष्ट होत आहे, असे प्रतिपादन येथील महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेचे अध्यक्ष सुरेश शेट्टी यांनी केले.
येथील महात्मा बसवेश्वर संस्थेच्या सभागृहात संस्थेच्या 31 व्या वार्षिक सभेत ते बोलत होते.
शेट्टी म्हणाले, गेल्या काही वर्षात नोटाबंदी, जीएसटी, कोरोना महापुर काळात जनतेची अर्थव्यवस्था कोलमडली. मात्र महात्मा बसवेश्वर संस्थेने परिस्थितीवर लक्ष ठेवत लॉकडाऊन काळात सेवकांनी ग्राहकांना चांगली सेवा दिली. त्यामुळे संस्थेवर सर्वांचा विश्वास वाढून गत वर्षात संस्थेच्या ठेवी, कर्ज वाटप, खेळते भांडवल, गुंतवणूक, सभासद संख्या निव्वळ नफा यामध्ये वाढ झाली आहे.
संस्था फक्त आर्थिक समृद्धीस सिमित न राहता सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून अनेक लोकांचे कोरोना काळात हित जोपासले आहे.
अहवाल सालात संस्थेत 39384 सभासद असून 44 लाखांवर भागभांडवल आहे. 31 कोटी 21 लाखांवर निधी तर अहवाल साला अखेर संस्थेत 329 कोटी 66 लाख 92 हजार ठेव आहे. 159 कोटी 91लाखांवर गुंतवणूक केली असून सभासदांना 184 कोटी 83 लाखांवर कर्ज वितरण केले आहे. अहवाल सालात संस्थेस 3 कोटी 6 लाखांवर निव्वळ नफा झाला आहे. संचालक मंडळाचे मार्गदर्शन व सर्वांच्या मागणीनुसार पुढील काळात विविध ठिकाणी संस्थेच्या नव्या शाखा प्रारंभ करणार असून यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी, मी स्वार्थी संचालक मंडळ व प्रामाणिक कर्मचार्यांमुळे संस्थेची वर्षानुवर्षे प्रगती होत असून यापुढील काळात 500 कोटी रुपयांच्या ठेवीचे उद्दिष्ट आहे. अडचणीच्या काळातही ठेवी वाढले असून कर्जही मोठ्या प्रमाणात दिले आहे. त्यांची वसुलीही चांगली होत असल्याचे सांगितले.
यावेळी जास्तीत जास्त ठेवी संकलित केल्याबद्दल विविध शाखेतील पदाधिकार्यांना गौरवण्यात आले. प्रारंभी प्रतिमा पूजन आणि प्रज्वलन झाले. संचालक डॉ. बी. व्ही. कोठीवाले यांनी स्वागत केले. संस्थेचे प्रधान व्यवस्थापक एस. के. आदन्नावर यांनी नफा तोटा ताळेबंद पत्रकाचे वाचन करून मंजुरी मिळवली.
सभेस संचालक प्रताप पट्टणशेट्टी, श्रीकांत परमणे, महेश बागेवाडी, सदानंद दुमाले, प्रताप मेत्राणी, किशोर बाली सदाशिव धनगर, पुष्पा कुरबेट्टी विजया शेट्टी, दिनेश पाटील यांच्यासह सोमनाथ परमणे, निरंजन पाटील, नारायण जनवाडे, रघुनाथ चौगुले, सुनील तावदारे, अण्णासाहेब पोकळे, रमेश भिवसे व सर्वच शाखेचे संचालक, सल्लागार, सभासद, ठेवीदार कर्मचारी उपस्थित होते.
संचालक अशोक लिगाडे यांनी आभार मानले.
Check Also
केंद्राने सीमाप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती करणारा ठराव संमत
Spread the love मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल निपाणीत आनंदोत्सव निपाणी : मराठी भाषेला …