Saturday , December 7 2024
Breaking News

बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत जारकीहोळी जिंकले.. भाजप हरले..

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत खर्‍या अर्थाने जारकीहोळी जिंकले, भाजप हरले असेच म्हणावे लागेल. जारकीहोळी बंधुंनी पुन्हा एकदा आपली ताकद राज्यातील सत्तारुढ सरकारला दाखवून दिली आहे
भाजपाने जारकीहोळी यांना विधानपरिषदची उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी, आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी विधानपरिषदच्या आखाड्यात अपक्ष उमेदवार म्हणून लखन जारकीहोळी यांना उतरवून भाजपाला धडा शिकविण्याचा निश्चय केला. निवडणुकीत पद्धतशीरपणे व्यूहरचना करुन लखन यांना विजयी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करुन विजयश्री खेचून आणण्याचे कार्य करुन दाखविले आहे. बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांचा पराजय मुख्यमंत्री बसवराज बोम्माई व बेळगांव जिल्ह्यातील भाजपाच्या 13 आमदारांना, त्यात दोघे मंत्री, दोन खासदार, एका राज्यसभा सदस्य व सर्व भाजपा पदाधिकार्‍यांची मान शरमेने खाली घालणेस लावणारा ठरला आहे.
बेळगांव जिल्ह्यात भाजपाचे बलाबल असताना काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी विजयी झाले आहेत. ही गोष्ट भाजपाला विचार करायला भाग पाडणारी निश्चित ठरली आहे. भाजपाचे उमेदवार महांतेश कवटगीमठ दुसर्‍या मतांनी देखील पराजित ठरावे ही भाजपाला लाजिरवाणी गोष्ट ठरली आहे. महांतेश कवटगीमठ यांना पराजित करण्यासाठी चंग बांधलेल्या भाजपा नेत्यांचे पितळ आता उघड पडले आहे. आता भाजपा हायकमांड त्यांच्यावर कोणती कारवाई करणार की झालं गेलं विसरून जाणार ते पहावे लागणार आहे.
जारकीहोळी बंधुंचा विजय
काँग्रेस असो भाजपा जारकीहोळी बंधुंची एकजूट कायम आहे. राजकारणात ते तू हसल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो. असे ठरवून राजकारण करीत आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण ते पक्षनिष्ठा सांभाळतांना बंधूभाव जोपासण्याचे कार्य देखील मनोभावे करताना दिसत आहेत. बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत तिकडे भाजपाला धडा शिकवून लखन यांना विजयी करण्याचे काम रमेश जारकीहोळी भालचंद्र जारकीहोळी यांनी करुन दाखविली आहे. इकडे काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांना विजयी करुन विजयाचे श्रेय कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व यमकनमर्डीचे विद्यमान आमदार सतीश जारकीहोळी यांनी पटकाविले आहे.
बेळगांव जिल्ह्यात जारकीहोळी भावंडांनी आपली ताकद राज्यातील नेत्यांना दाखवून दिली आहे. आता जारकीहोळी परिवारात तीन विधानसभा सदस्य, एक विधानपरिषद सदस्य असे चौघे आमदार बनले आहेत. एकाच कुटुंबातील चौघे आमदार होण्याचा मान त्यांनी पटकाविला आहे.

About Belgaum Varta

Check Also

तळेवाडी-गोल्याळी मार्गावर वाघाचे दर्शन!

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील तळेवाडी-गोल्याळी मार्गावर काल शुक्रवारी 6 रोजी रात्री 8.00 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *