
निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदार संघाचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचा रविवारी (८) रोजी ६१ वा वाढदिवस साजरा होत आहे. हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याप्रमाणे येथील महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात श्री गणेश मंडळ व हेल्थ क्लब यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली.
रविवार सकाळी ९ वाजता येथील महादेव मंदिर सांस्कृतिक भवनात भवनात रक्तदान शिबिराला प्रारंभ होणार आहे. हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील व उपाध्यक्ष पवन पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कारखान्याचे संचालक, नगरसेवक तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच सध्या शहरात डासांचे प्रमाण वाढल्याने त्याचा नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक ६, ७, ८, १४ यासह विविध प्रभागात फॉगिंग मशीनच्या माध्यमातून डास प्रतिबंधक औषधाची फवारणी केली जाणार आहे. याशिवाय अन्य सामाजिक उपक्रमही राबवले जाणार आहेत, अशी माहिती सुनिल पाटील यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta