
संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांची माहिती
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत को- ऑप. क्रेडिट सोसायटी मल्टीस्टेट संस्थेने ११०४ कोटी ठेवींचा टप्पा पार करून २००० कोटींकडे वाटचाल केली आहे. या संस्थेच्या जयसिंगपूर येथील ५७ व्या शाखेचे उद्घाटन बुधवारी (ता.१८) सकाळी १० वाजता इंगळे बिल्डिंग ७ वी गल्ली गांधी चौक येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली.
स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आमदार राजेंद्र पाटील -यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी व दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.१३८७० सभासदअसलेल्या या संस्थेत ११०४ कोटींची ठेवी आहेत. ९३८ कोटींवर कर्ज देऊन संस्थेने १७९ कोटींची गुंतवणूक केली आहे. विविध कर्ज योजना व ठेव योजनांचा लाभ सर्वसामान्य देऊन आर्थिक जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही संस्था महाराष्ट्र राज्यातही विस्तारित व्हावी, अशी सभासदांची मागणी होती. त्याची दखल घेत मल्टीस्टेटच्या माध्यमातून संस्थेला महाराष्ट्र राज्यात शाखा- प्रारंभ करण्यास परवानगी मिळाली आहे.
यावेळी उपाध्यक्ष सतीश पाटील, संचालक अभिनंदन पाटील, सुभाष शेट्टी, अभय करोले, जयपाल नागावे, आप्पासाहेब कडोले, भुजगोंडा पाटील, पिरगोंडा पाटील, शरदकुमार लडगे, बाबासाहेब आपराज, श्रीकांत वसवाडे, अनिता मगदुम, निर्मला बल्लोळे, संदीप पाटील, शिवानंद राजमाने, अजित कांबळे, सीईओ अशोक बंकापुरे, सहाय्यक शांतिनाथ तेरदाळे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta