
निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित दुर्गामाता दौंडला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आकर्षक रांगोळ्या, ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, पंचारती औक्षण अशा भारलेल्या वातावरणात निपाणी ते दुर्गा माता दौडशी नवमी साजरी झाली.

येथील मध्यवर्ती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तिचे पूजन चारुदत्त पावले व ध्वज आणि शस्त्र पूजन भाग्येश कुरबेट्टी यांच्या हस्ते करून ध्येय मंत्राने श्री दुर्गामाता दौडला रविवारी (ता.२२) पहाटे सुरवात करण्यात आली. तिथून श्री दुर्गामाता दौड निपाणकर राजवाड्याकडे मार्गस्थ झाली. निपाणीकर वाड्यातील आदिशक्ती श्री जगदंबेची आरती करून श्री दुर्गामाता दौड छत्रपती शिवाजीनगर सातव्या गल्लीकडे मार्गस्थ झाली. तिथून श्री दुर्गामाता दौड पंतनगर, डायमंड कॉलनी, लेटेक्स कॉलनी या परिसरात आल्यावर फुलांचा वर्षाव करून श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण परिसर शिव जयघोषणे दुमदूमला गेला होता. तिथून श्री दुर्गामाता दौड छत्रपती शिवाजीनगर परिसरामधील अंबाबाई मंदिर कडे मार्गस्थ झाली. या ठिकाणी आरती करून पुन्हा दौड मध्यवर्ती शिवाजी चौकात आल्यावर प्रेरणा मंत्राने सांगता करण्यात आली. यावेळी विशाल मोडीकर, उमेश भिसे, अमित खोत, चंदू सुतार, सौरभ तावरे, अभिजित खोत, मारुती भिसे, प्रवीण भिसे, विशाल घोडके यांच्यासह मध्यवर्ती श्री शिवाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते व शिव प्रेमी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta