कोगनोळी : येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रेनिमित्त प्रजावाणी फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने गुरुवार तारीख 9 रोजी सायंकाळी 6 वाजता येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचे आजच्या युवकांची दशा व दिशा या विषयावर व्याख्यान होणार असल्याची माहिती प्रजावाणी फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मुरारी कोळेकर यांनी दिली.
प्रजावाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या चार-पाच वर्षांमध्ये विविध समाज उपयोगी कामे केली आहेत. समाजातील युवकांना योग्य मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी पंचक्रोशीतील विविध स्तरात कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्काराचेही आयोजन केले असल्याची माहिती यावेळी दिली.
या व्याख्यानाचा लाभ पंचक्रोशीतील युवक व नागरिकांनी घेण्याचे आव्हान केले आहे.
यावेळी सचिन परीट, पोपट पसारे, लक्ष्मण जगताप, तात्यासो खोत, नितीन कानडे, युवराज परीट यांच्यासह प्रजावाणी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta