निपाणी आगारातील परिस्थिती; अनेक बसना स्टार्टरचा अभाव
निपाणी (वार्ता) : हुबळी विभागामध्ये आगाराच्या उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर असलेल्या निपाणी येथील आगारातील अनेक बसना स्टार्टर्स नसल्याने धक्का मारून सुरू करावा लागत आहेत. त्यामुळे बस चालक, वाहक आणि प्रवाशातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भंगार अवस्थेतील बस बंद करण्याची मागणी प्रवाशातून होत आहे.
निपाणी आगारातून कर्नाटक आणि महाराष्ट्रात विविध मार्गावर बस सोडल्या जात आहेत. पण अनेक बस नादुरुस्त होत असूनही किरकोळ दुरुस्तीची कामे करून बस मार्ग केल्या जात आहे. त्यामुळे अनेक बस वाटेतच बंद पडून प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत चालक आणि वाहक आणि बऱ्याचदा आगार प्रमुखांना सांगूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. येथील आगारातच अनेक बस बंद पडत आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवाशांना बसला धक्का देऊन सुरू कराव्या लागत आहेत.
आगारातील दुरुस्ती विभागात कर्मचारी असूनही बसच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक बसचे हेडलाईट लागत नसल्याने सायंकाळच्या वेळी चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर काही बस मध्ये स्टार्टर नसल्याने प्रत्येक वेळी बस ढकलून सुरू करावी लागत आहे. तरी आधार प्रमुखांनी त्या समस्याकडे लक्ष देऊन तात्काळ सुस्थितीतील बस सोडण्याची मागणी चालक वाहकासह प्रवाशातून होत आहे.
—————————————————————-
‘गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता सुमारास निपाणी- गजरबरडी प्लॅटफॉर्मवर लागली होती. सर्व प्रवासी बसल्यानंतर स्टार्टर लावावी बस सुरू न झाल्याने प्रवाशांना धक्का द्यावा लागला. त्यानंतर बस सुरू होऊन मार्गस्थ झाली. त्यामुळे आगार प्रमुखांनी तात्काळ बसचे दुरुस्ती करून प्लॅटफॉर्मर लावणे आवश्यक आहे.’
-स्वप्निल पाटील, प्रवासी, गजबरवाडी
—————————————————————
‘सध्या आगारातील काही बस नादुरुस्त झाल्या असून त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. काही बसना स्टार्टर नसल्याने ते बसवण्याचे काम सुरू आहे. या पुढील काळात सुस्थितीतील बस प्लॅटफॉर्मवर लावल्या जातील.’
-संगाप्पा, आगार प्रमुख, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta