सुजित म्हेत्री : मानव बंधुत्व वेदिकेतर्फे कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य मानव बंधुत्व वेदिकेचे संस्थापक अध्यक्ष पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सौंदलगा येथील स्मशानभूमीमध्ये व्याख्यानाचे आयोजन केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमात मान्यवराकडून मार्गदर्शन होणार आहे. यावेळी निपाणी तालुक्यातील मानव बंधुत्व वेदीकेचे कार्यकर्ते व दलित समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मानव बंधुत्व वेदिकेचे सुजित म्हेत्री यांनी केले. येथील शासकीय विश्राम धामात शनिवारी (ता.२) सायंकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
सुजित म्हेत्री म्हणाले, मानव बंधुत्व वेदिकेचे कर्नाटक राज्य अध्यक्ष रवी नायकर, जिल्हा विभाग अध्यक्ष भरमान्ना तोळी, बेळगाव जिल्हा अध्यक्ष जीवन मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. यावेळी ए. जी. कांबळे, सीमाताई पाटील, पी. डी. पाटील व मान्यवरांची व्याख्याने होणार आहे. याशिवाय ५ रोजी रात्री अंधश्रद्धा निर्मूलन, मुलांचे शिक्षण आणि भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही म्हेत्री यांनी केले.
बैठकीस सदाशिव कांबळे, आनंद मस्ताने, राहुल लाटकर, गणेश कांबळे, शंकर जाधव, प्रवीण सौंदलगे, बाळू माने, विनोद मोरे यांच्यासह मानव बंधुत्व विविधतेचे कार्यकर्ते उपस्थित होते.