Tuesday , March 3 2026
Breaking News

एस. बी. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील येथील मोहनलाल दोशी विद्यालयात ३१ वर्षे सेवा बजावणाऱ्या कलाशिक्षिका एस.बी. पाटील यांचा सेवनिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ पार पडला.
प्रमुख पाहुणे जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाई शाह यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन पाटील दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रकाश शाह यांनी सत्कार मूर्तीच्या कामाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांनी प्रास्ताविकातून सत्कारमूर्तीनी निरपेक्ष सेवा बजावल्याबद्दल कौतुक केले. शिक्षक प्रतिनिधी आर. आर. कपले यांनी स्वागत केले. एस. एस. सांडगे यांनी मानपत्राचे वाचन केले. ज्ञानेश्वरी पोवार, शांभवी टिकले, मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले.
पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आर. एस. भोसले, माजी मुख्याध्यापक पी. वाय. पाटील, अक्षय पाटील यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. आर. डी. देसाई यांनी सूत्रसंचालन केले. डी. बी. बेनाडे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी बस स्थानकात अस्वच्छ स्वच्छतागृह; तरीही दुप्पट रक्कम आकारून प्रवाशांची लूट

Spread the love  निपाणी (वार्ता) : महिलांना मोफत बस सुविधा पुरविणाऱ्या वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाकडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *