कोगनोळी (वार्ता) : येथील हणबरवाडी रोडवर असणार्या इनाम पट्टी मळ्यात वीस एकर उसाला शॉर्टसर्किटने आग लागून जळून खाक झाल्याची घटना मंगळवार तारीख 11 रोजी दुपारी 3 च्या सुमारास घडली.
यामध्ये शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील हणबरवाडी रोडवर असणार्या इनाम पट्टी मळ्यात उसा लागतच असणार्या विद्युत टिसी वरून शॉर्टसर्किट होऊन ऊसाला आग लागली. बघता बघता आगीने उग्र रूप धारण केले. सुरुवातीला शेतकर्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण वारे जोरात असल्याने आग आटोक्यात आली नाही. सदर घटनेमध्ये दिलीप पाटील, संतोष पाटील, सुनील मगर, उमराव पाटील, निवृत्ती जाधव, भूपाल जगताप, अभिमन्यु जाधव, संजय पाटील यांच्यासह अन्य शेतकर्यांचा ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सदर ऊस कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास नोंद आहे. शाहू सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभाग अधिकार्यांनी भेट देऊन पाहणी केली.
Check Also
जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे
Spread the love पाणी प्रश्नासाठी आत्मक्लेष आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयातून येणार कमिटी निपाणी (वार्ता) : येथील …