कोगनोळी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे नवीन अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्याला भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली.
यावेळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली.
अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख महानिंग नंदगावी म्हणाले, कर्नाटक लगत असणार्या महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत असल्या कारणाने प्रशासनाने महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणार्या प्रवाशांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्ट असणे गरजेचे आहे. रिपोर्ट शिवाय कोणालाही कर्नाटकात प्रवेश देऊ नये. बंदोबस्त कडक करावा. याठिकाणी बंदोबस्तासाठी गरज पडल्यास आणखीन कर्मचार्यांची नेमणूक करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी उपनिरीक्षक एस. एस. कर्निग, कोगनोळी पोलीस स्टेशनचे एएसआय एस. ए. टोलगी, संदीप गाडीवडर, शिवप्रसाद के यांच्यासह अन्य पोलीस, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या उपस्थित होते.
Check Also
गोरक्षण सेवा समिती निपाणीची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेण्यात येणारी १८ वासरे, ३४ रेडके पकडली
Spread the love कागल पोलिसांची कारवाई; एक ताब्यात निपाणी : कत्तलीसाठी चार दिवस व एक …