Monday , December 8 2025
Breaking News

मराठा बटालियनच्या सायकलस्वारांचे मध्यवर्ती शिवाजी चौकात स्वागत

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव ते सिंहगड या ६०० किलोमीटर सायकल रॅलीने गडकोटला भेट देणाऱ्या मराठा लाइट इन्फंट्रीच्या ११ सायकल स्वार जवानांचे निपाणीत मध्यवर्ती छत्रपती शिवाजी तरुण मंडळ आणि निपाणी भाग आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत करण्यात आले.
४ फेब्रुवारीला झालेल्या मराठा दिनानिमित्त ११ लष्करी जवानांनी सायकलवरून राजहंसगड, पन्हाळा, प्रतापगड, अजिंक्यतारा, सिंहगड आदी शिवकालीन गडकोट मोहीम आखली होती. या पार्श्वभूमीवर लष्कराच्या या तुकडीने बेळगाव येथून संकेश्वरमार्गे शिवकालीन वल्लभगडास भेट देवून निपाणीस भेट दिली.
त्यामध्ये मेजर संदीपकुमार, नायब सुभेदार अनिल तिबीले, हवालदार भारत केंद्रे, गोरखनाथ उमराणे, नाईक बाळकृष्ण नंदू सिपाही, प्रदीप गरुड, शेखर काळे, ऋतुराज चरणे, दिपक बोराडे, निवृत्त हवालदार कृष्णा अब्दागिरे, दिनकर पाटील आदींचा समावेश होता. यावेळी जवानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. शिवप्रेरणा मंत्र, गीत गाण्यात आले. त्यानंतर शिव जयघोष करण्यात आला. निवृत्त सुभेदार मेजर अशोक रेंदाळे, रविंद्र पोवार व मान्यवरांच्या हस्ते जवानांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुभेदार मेजर रविंद्र पोवार, सुभेदार मेजर गणपती कुलकर्णी, सुभेदार संजय इंगळे, हवालदार गजानन पाटील, सीएचएम संजय साजणे, नगरसेवक विनायक वडे, संजय माने, धनाजी निर्मळे, नितीन साळुंखे, अनिल भोसले, पांडुरंग भोई, अजित पाटील, अतुल शिंदे, दादू कळस्कर, विशाल घोडके, रुपेश तोडकर, सुहास हसूरे, शुभम गिरी, प्रविण भोसले, प्रथमेश पाटील, देवेंद्र देवकाते, चेतन श्रीखंडे यांच्यासह मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
वल्लभगड येथे आजी-माजी सैनिक संघटनेकडून टीमचे स्वागत करण्यात आले. यावेळी राजेंद्र पाटील, पवन पाटील, माजी सैनिक पांडुरंग बोरे, प्रकाश मगदूम, सदाशिव शेलार, लक्ष्मण शेंडे, रावसाहेब पाटील, राजू खानुरे, बचाराम खाडे, एम. बी पाटील, विलास शेलार, शिवाजी शेलार, अनिल गायकवाड, ज्योतिबा शेडूरे, बाळू डंगे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *