निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहतर्फे श्री छत्रपती शिवाजीनगर फ्रेंड सर्कल यांच्या संयोजनाखाली समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित ‘अरिहंत चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (ता.६) झाले. या स्पर्धेत ४५ संघानी सहभाग घेतला आहे
प्रारंभी बोरगाव येथील पृथ्वीराज अभिनंदन पाटील यांच्या हस्ते यष्टी पूजन, नगरसेवक रवींद्र शिंदे, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांच्या हस्ते फित कापून स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यानंतर बोरगाव विरुद्ध शिरगुप्पी संघात पहिला सामना झाला. यावेळी जुने खेळाडू झुंजार धुमाळ, अनिल काळगे उत्तम जाधव श्रीमंत चव्हाण, महेंद्र सूर्यवंशी, अरविंद ताते, सुनील कांबळे यांचा सत्कार झाला.
प्रथम क्रमांकासाठी १ लाख, व्दितीय ५० हजार, तृतीय क्रमांकास २५ हजार रुपये अशी बक्षिसे आहेत. याशिवाय मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द मॅच फायनल अशी वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत.
यावेळी नगरसेवक संजय पावले, शौकत मनेर, दत्ता नाईक, दिलीप पठाडे, सुनील शेलार, शशीकुमार गोरवाडे, सचिन गारवे, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, विनायक वडे, इमूरान मकानदार, शिरीष कमते, आकाश देसाई, वकील संजय चव्हाण यांच्यासह क्रिकेट प्रेमी नागरिक उपस्थित होते. चंदू मोरे यांनी सूत्रसंचालन केले.